“Some rise by sin and some by virtue fall”

मध्यंतरी ब्रिटिश लायब्ररी गेले असताना तिथे शेक्सपिअर ची काही quotes मोठी करून लावली होती…ती सगळी त्याच्या अलौकिक प्रतिभेची द्द्योतकच होती…पण त्यातल्या एका ने मात्र मनाचा ठाव घेतला…”Some rise by sin, and some by virtue fall. Some run from breaks of ice, and answer none, And some condemned for one fault alone “.ह्या ओळी त्याने लिहिलेल्या Measure for measure ह्या नाटकातील आहेत .साधारणतः सद्गुण किंवा virtue हा चांगले जीवन जगण्यासाठी चा आवश्यक गुणधर्म मानला गेला आहे . ऍरिस्टोटल च्या थिअरी नुसार सद्गुण हे स्वभाव वृत्तीचे स्थिती दाखवतात .विविध परिस्थितीमध्ये माणूस काय अनुभवतो ,कसा विचार करतो , त्याचीच प्रतिक्रिया त्याच्याच प्रतिसादातून कशी व्यक्त होते आणि शेवटी कोणत्या पर्यायाची तो कृती साठी तो निवड करतो ,हे सारं तो आपल्या स्वभावानुसार सद्गुण व दुर्गुणाच्या आधारे करत राहतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडक्यात म्हणजे सद्गुण हे चांगले इच्छिण्याचे ,चांगले अनुभवण्याचे आणि चांगले निवडण्याचा मनाचा कल आणि त्यासाठी घेतलेले कष्ट असतात. ह्या सद्गुण आणि सदाचारामुळे जीवन अधिक चांगले आणि लौकिक अर्थानी समृद्ध बनते.

post

पण जगाच्या इतिहासात अशी असंख्य माणसे ह्या सिध्दान्ताच्या विपरीत जगली आणि मिटून गेली.दुर्गुणी माणसांच्या उदयाला निश्चित अशी कोणतीही तत्वे ,विश्लेषण लागू पडत नाही, त्याउलट चांगल्या सद्गुणी माणसाच्या उतरणीला काही मीमांसा उरते.कदाचित हे सारे लोक व्यावहारिक शहाणपणा विसरले असावेत, का सद्गुणांचे स्वरूपच असे आहे ,की त्यात त्याचाच ऱ्हास करणारा दुर्गुण लपतो.आजच्या काळात जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि सद्गुण यांचा काही ताळमेळ बसत नाही ….आणि त्यामुळे मग अंतर्मनात व वागण्यात संघर्ष आणि विरोध सुरु होतो.

जगण्याच्या समतोल राखण्याच्या धडपडीत, त्यांना कायम तडजोड स्वीकारावी लागते. अर्थात वरकरणी पाहता ही तडजोड म्हणजे त्यांना सामान्याप्रत येण्यासाठी मोजावी लागलेली एक औपचारिक किंमतच असते.